तरुणावर वार करणाऱ्या
दोन जणांना अटक

तरुणावर वार करणाऱ्या दोन जणांना अटक

Published on

पुणे, ता. ८ : किरकोळ वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करणाऱ्या दोघा तरुणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासमवेत असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
करण शिवाजी जमादार (वय १९, रा. सिंहगड महाविद्यालयाजवळ, वडगाव बुद्रुक) आणि शुभम साधू चव्हाण (वय १९, रा. आंबेगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
ही घटना चार सप्टेंबर रोजी घडली. फिर्यादी महिलेचा मुलगा मित्रांसमवेत मोबाइलवर गेम खेळत होता. त्यावेळी करण, शुभम आणि त्यांचे साथीदार तीन दुचाकींवर आले. क्षुल्लक वादातून त्यांनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांनी दाखल केला होता.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू करीत परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपास पथकातील पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना आरोपींचा ठावठिकाणा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून करण, शुभम यांना अटक केली. तसेच, अन्य दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले.

Marathi News Esakal
www.esakal.com