कृत्रिम हौदांना भरभरून प्रतिसाद

कृत्रिम हौदांना भरभरून प्रतिसाद

Published on

पुणे, ता. ८ ः नदी, कालव्यात गणपती मूर्ती विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्याच्या पुणे महापालिकेच्या आवाहनाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. १० दिवसांत ६ लाख ५४ हजार ४१० गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विसर्जन झालेल्या मूर्तीची संख्या जवळपास एक लाखाने वाढली आहे; तर ९ लाख २३ हजार ३९८ किलो निर्माल्य जमा झाले आहे.
महापालिकेतर्फे विसर्जनासाठी नदीकाठी ३८ हौद तयार केले आहेत. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत २८१ ठिकाणी सुविधा ६४८ ठिकाणी लोखंडी टाक्यांची विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी २४१ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र सुरू केले होते, ३२८ ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले होते. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन व्हावे यासाठी महापालिकेसह शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेतला होता.

आकडे बोलतात
- संपूर्ण गणेशोत्सवात ३८ हौदामध्ये १ लाख १३ हजार १३६ मूर्तींचे विसर्जन
- लोखंडी टाक्यांमध्ये ३ लाख ६२ हजार ३१९ मूर्तींचे विसर्जन
- १ लाख ७८ हजार ९५५ मूर्ती संकलित
- विसर्जनाच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण शहरात ४ लाख ४७ हजार ३८४ मूर्तींचे विसर्जन

गणपती विसर्जनाऐवजी मूर्ती दान करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी ६ लाख ५४ हजार ४१० मूर्तींपैकी १ लाख ७८ हजार ३७६ मूर्ती दान केल्‍या आहेत, तर गेल्यावर्षी २०२५ मध्ये एकूण ५ लाख ५९ हजार ९५२ मूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यात १ लाख ७६ हजार ६७ मूर्ती दान केल्या होत्या.
- संदीप कदम, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग

निर्माल्याचा खत म्हणून वापर
गणेशोत्सवात व विसर्जनाच्या वेळेत संकलित केले जाणारे निर्माल्य हे शेतकऱ्यांना खत तयार करण्यासाठी दिले जाते. यंदाच्या वर्षी ९ लाख २३ हजार ३९८ इतके निर्माल्य जमा झाले आहे. यापूर्वी २०२४ मध्ये ७ लाख ६ हजार ४७८ किलो, २०२३ मध्ये ६ लाख २७ हजार ६९७ किलो निर्माल्य जमा झाले होते. यावर्षी महापालिकेकडून निर्माल्य संकलनाची सुविधा वाढविल्याने तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने तब्बल ८७६ टन निर्माल्य संकलन झाले आहे. २०२४ मध्ये ७०६ टन तर २०२३ मध्ये ६५० टन निर्माल्याचे संकलन झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत महापालिकेकडून यावर्षी समाविष्ट गावांतही निर्माल्य संकलनावर भर दिल्याने हे निर्माल्य नदीत जाण्यापासून वाचले आहे, तर या निर्माल्यापासून महापालिका खत तयार करणार असून, ते शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com