तुमच्यातील ध्यासाचा होणार गौरव

तुमच्यातील ध्यासाचा होणार गौरव
Published on

पुणे, ता. २६ : ‘ग्लिफ्स सीसीई’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘पुणे पॅशन आयकॉन्स’ पुरस्काराचा दुसरा सीझन सुरू होत असून, यासाठी नामांकने मागविण्यात आली आहेत. ‘सकाळ माध्यम समूह’ या पुरस्कारांचा माध्यम प्रायोजक आहे. बरवा स्कीन थेरपी यांचे या कार्यक्रमाला सहकार्य असून, ‘बिग एफएम’ रेडिओ पार्टनर आहेत.
‘पॅशन’ किंवा ध्यासाशिवाय कोणतीही कला आणि कौशल्य विकसित होऊ शकत नाही. यामुळेच विविध कला आणि क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरीचा ध्यास घेतलेल्यांना ‘पॅशन आयकॉन्स’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. शास्त्रीय गायन, बॉलिवूड गायन, शास्त्रीय नृत्य, बॉलिवूड नृत्य, वादक, भित्तिकला (वॉल आर्ट), कागदी कला (पेपर आर्ट), फॅशन (फोटोग्राफी आणि वस्त्रे), योगासने, बागकाम, साहसी क्रीडा प्रकार (ॲडव्हेंचर स्पोर्ट्‌स), कचऱ्यातून कला आणि व्लॉगर्स अशा विविध विभागांमध्ये नामांकने मागविण्यात येत आहेत.
सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी पॅशन कशी जपली, विविध आव्हानांवर मात कशी केली, अधिक ज्ञान मिळवून किंवा अधिक कष्ट करून स्वतःमध्ये कशा सुधारणा केल्या, याबाबत स्वानुभव सांगण्याची संधी मिळणार आहे. ज्या व्यक्तींनी विविध क्षेत्रांत ध्यास घेऊन प्रगती केली, त्यांना ओळखणे आणि त्यांची प्रेरक कहाणी इतरांसमोर आणणे हा ‘ग्लिफ्स सीसीई’चा उद्देश आहे.
ग्लिफ्स सीसीई हा गायत्री फाटक आणि सलिल चोडणकर यांनी स्थापन केलेला मंच आहे. बरवा स्कीन थेरपी, बिग एफएम, महाराष्ट्र लेडीज असोसिएशन यांचेही प्रायोजकत्व ‘पुणे पॅशन आयकॉन्स’ पुरस्कारांना मिळाले आहे.
अधिक माहितीसाठी ९८९०१६३३०५ या क्रमांकावर दूरध्वनी करून किंवा त्याच क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज करून किंवा connect@glyphscce.com या पत्त्यावर संपर्क साधता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com