महारेरा परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी
पुणे, ता. ९ : महारेरा सक्षमता प्रमाणपत्र सर्व स्थावर संपदा अभिकर्ते आणि बांधकाम क्षेत्रातील विकसकांकडे स्थावर संपदा व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनिवार्य झाले आहे. यासाठी महारेरा मान्यताप्राप्त संस्थेमार्फत होणारे २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे व ‘आयबीपीएस’तर्फे होणारी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल १५ एप्रिलला सुरू झाले आहे. १४ मे रोजी हे पोर्टल बंद होणार असल्याने त्यापूर्वी एजंटचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. पोर्टल बंद होण्यापूर्वीचे पुढील प्रशिक्षण १२ मे रोजी सुरु होणार आहेत. डिसेंबर २०२४ नंतर २०२५ या वर्षात प्रथमच पोर्टल खुले झाले आहे. यापुढे लवकर पोर्टल खुले होण्याची शक्यता कमी असल्याने प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षेस सामोरे जाण्याची ही शेवटची संधी आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५
पटकथा लेखन कार्यशाळा
चित्रपट क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि कलावंतांना पटकथा लेखनाविषयीची माहिती असणे गरजेचे असते. एखाद्या संकल्पनेवरून चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी व्यक्तिरेखांकन, कथा, पटकथा आणि संवाद लेखनाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. चित्रपट उद्योग क्षेत्रात उत्तम पटकथा लेखकांची खूप मागणी आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा १७ व १८ मे रोजी आयोजिली आहे. यामध्ये पटकथा लेखनाची प्रक्रिया व त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
डिजिटल चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम
चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या संधी सध्या उपलब्ध आहेत. चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण देणारा तीन महिन्यांचा आठवड्याच्या शेवटी चालणारा अभ्यासक्रम २४ मेपासून सुरु होत आहे. यात ८० टक्क्यांपेक्षा जास्त अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर आधारित असून यामध्ये विद्यार्थ्यांकडून लघुपट निर्मिती केली जाणार आहे. अभ्यासक्रमात चित्रीकरणाचे तंत्रज्ञान, संकलन, व्हीएफएक्स इफेक्ट, संकल्पना, कथालेखन, पटकथा निर्मिती आणि चित्रपट प्रदर्शन इत्यादी अनेक घटकांवर मार्गदर्शन होणार आहे. अभ्यासक्रम चित्रपटसृष्टी तसेच दूरचित्रवाणी क्षेत्रातील २५ हून जास्त वर्षांचा अनुभव असलेले दिग्दर्शक शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जाणार आहे. प्रत्यक्ष चित्रीकरण स्थळाला भेटीचे आयोजन आहे.
संपर्क : ८४८४८२२१६६
प्रॅक्टिकली शिका इव्हेंट मॅनेजमेंट
इव्हेंट मॅनेजमेंट हा १० सत्रांचा विकेंड क्रॅश कोर्स रमेश पाटणकर इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच सुरू होत आहे. यात लाइव्ह फील्ड एक्सपिरियन्स देण्यात येणार असून दोन सत्रांमध्ये इव्हेंट सेटअप, डेकोरेशन, ड्रेपिंग आणि व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक घेण्यात येईल. अनुभवी आणि नावाजलेल्या मेंटर्सकडून मार्गदर्शन, बजेट मॅनेजमेंट सत्रात इव्हेंट बजेट नीट कसे हाताळावे तसेच कॉर्पोरेट इव्हेंट्स, इव्हेंट मॅनेजमेंटचे महत्त्वाचे पैलू जसे की प्रॅक्टिकल सोल्यूशन्स, लॉजिस्टिक्स हँडलिंग आणि क्रिएटिव्ह एक्सेक्यूशन इ.विषयी मार्गदर्शन होईल. इव्हेंट इंडस्ट्रींना कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी असून हा कोर्स करणाऱ्यांना ही कौशल्ये शिकण्याची संधी आहे.
संपर्क : ८४८४८२२१६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.