‘सेल्फी विथ बुकशेल्फ’ स्पर्धेत सारा सावंत, योगेश बाबर प्रथम
पुणे ता. १२ : ‘सकाळ प्रकाशना’तर्फे २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिनानिमित्त‘सेल्फी विथ युवर बुकशेल्फ’ ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये लहान गटात नागपूरमधील सारा रूपाली उत्तम सावंत हिने, तर प्रौढ गटात पुण्यातील योगेश बाबर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेला महाराष्ट्रासह गुजरातमधूनही प्रतिसाद मिळाला.
‘सकाळ प्रकाशना’तर्फे २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिनानिमित्त‘सेल्फी विथ युवर बुकशेल्फ’ ही स्पर्धा घेण्यात आली. यातील विजेत्यांना लेखक व रॅपर सुजय जिब्रिश यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. त्याप्रसंगी त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. यानिमित्ताने त्यांनी सादर केलेल्या ‘रॅप’मुळे संगीतमय वातावरणात हा सोहळा रंगतदार झाला.
‘‘वाचनावरील प्रेम, जतन केलेली ग्रंथसंपदा आणि मराठी भाषेचा गौरव, अशा साऱ्या मूल्यांचं सुंदर संयोजन अनुभवायला मिळालं,’’ असे गौरवोद्गार रॅपर सुजय यांनी काढले.
दोन वर्षांच्या लहानग्यांपासून ते ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एक हजारांहून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या विजेत्यांची निवड पुस्तकसंग्रहाची गुणवत्ता, पुस्तकांच्या मांडणीतील सौंदर्य या निकषांवर करण्यात आली.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. सर्वाधिक प्रवेशिका पुण्यातून, त्यानंतर नागपूर आणि मुंबई, अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नाशिक आणि जळगाव येथून आल्या होत्या. विशेष म्हणजे, या स्पर्धेला गुजरातमधूनही काही प्रवेशिका आल्या. यामुळे या उपक्रमाचा विस्तार महाराष्ट्राच्या पलीकडेही झाल्याचे दिसून आले. लहान आणि प्रौढ अशा दोन्ही गटांमध्ये पारितोषिके देण्यात आली.
विजेते स्पर्धक : लहान गट
प्रथम- सारा रूपाली उत्तम सावंत (नागपूर), द्वितीय- विक्रमादित्य अभिजित चव्हाण (सांगली) व उत्तेजनार्थ- शांभवी आनंद कदम (पुणे)
विजेते स्पर्धक : प्रौढ गट
प्रथम- योगेश बाबर (पुणे), द्वितीय- अभिलाष सूपसांडे (नागपूर) व तृतीय- डॉ. स्नेहलदत्त श्रीकृष्ण खाडे (कोल्हापूर)
उत्तेजनार्थ :
राम गोविंद धुमाल (पुणे), प्रज्ज्वल श्रीगणेश कोरगांवकर (विरार), प्रशांत पंढरीनाथ गुरव (जळगाव) व रेवणसिद्ध लोणकर (शिवणे, पुणे)
‘माझ्याशी नीट बोलायचं’
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली मराठी रॅपर सुजय जिब्रिश (सुजय जाधव) यांची दमदार मैफील. त्यांच्या ‘खुर्ची’ आणि ‘माझ्याशी नीट बोलायचं’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. शिवाय, त्यांनी त्यांच्या नवीन अप्रकाशित गाण्यांचाही नजराणा उपस्थितांसमोर सादर केला. त्यांच्या संवादपूर्ण मुलाखतीला आणि सादरीकरणाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली.
पुस्तक हे त्या विषयातले तज्ज्ञ आपल्या अनुभवातून किंवा संशोधन करून लिहीत असतात. म्हणून पुस्तक वाचणे म्हणजे एखाद्या तज्ज्ञांकडून शिकवण घेण्यासारखेच आहे, असे माझे ठाम मत आहे.
- अभिलाष सूपसांडे, नागपूर
राज्यभरातून वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठीचा बुकशेल्फ सोबत सेल्फी उपक्रम राबविला. तुमचे खूप खूप अभिनंदन. पारितोषिकांमुळे प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले आणि जबाबदारीही वाढली आहे.
- प्रशांत गुरव, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.