आरोग्यदायी बिस्कीट व कुकीज
पुणे, ता. १२ : आरोग्याच्या दृष्टीने मैदाविरहित पदार्थांचे महत्त्व खूप आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक दृष्टीतून घरीच मैदाविरहित बिस्कीट, कुकीज व ग्लुटन फ्री केकचे विविध प्रकार शिकवणारी कार्यशाळा १७ व १८ मे रोजी होणार आहे. यामध्ये बिस्कीट, कुकीज व केक व्यवसायाला असणारी मागणी, नावीन्यपूर्ण पद्धती आणि अतिशय पौष्टिक अशा विविध प्रकारच्या कुकीज कशा तयार करायच्या याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये गहू, नाचणी, मिलेट्स, बाजरी, ड्रायफ्रूट, नमकीन, जीरा, उपवासाचे, हैदराबादी, शुगर फ्री बिस्कीटसह हेल्दी कुकीज व नानकटाई हे प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील. त्याचप्रमाणे फ्रूट, खजूर, मावा, पंचामृत, मँगो ड्रायफ्रूट, पमकिन, कॅरेट मलाई, मिलेट्स, उपवास स्पेशल, टी टाइम स्पेशल हे केकचे प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील.
संपर्क : ८४८४८११५४४
पटकथा लेखन कार्यशाळा
चित्रपट क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि कलावंतांना पटकथा लेखनाविषयीची माहिती असणे गरजेचे असते. एखाद्या संकल्पनेवरून चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी व्यक्तिरेखांकन, कथा, पटकथा आणि संवाद लेखनाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. चित्रपट उद्योग क्षेत्रात उत्तम पटकथा लेखकांची खूप मागणी आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा १७ व १८ मे रोजी आयोजिली आहे. यामध्ये पटकथा लेखनाची प्रक्रिया व त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
शासकीय निविदा प्रक्रियेतील
सहभागी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण
महानिविदा संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध/ फ्लॅश करण्याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे खास अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेले प्रशिक्षण १८ मे रोजी आयोजिले आहे. यात विविध संकेतस्थळांचा समावेश केला आहे. शासकीय निविदा प्रक्रियेत सहभागी असणारे अधिकारी, ग्रामसेवक, संगणक ऑपरेटर, सरकारी कंत्राटदार, स्थापत्य अभियंते व इतर संबंधित अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण उपयुक्त आहे. यात निविदा नोटीसची तयारी, निविदा प्रकाशित करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, संगणक सेटिंग, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, प्री बीड मीटिंग, निविदा उघडण्याची प्रक्रिया, वर्क ऑर्डर इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
मेडिकल कोडिंगबाबत वेबिनार
मेडिकल कोडिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एसआयआयएलसी आणि टेक महिंद्रा स्मार्ट हेल्थकेअर ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन महिन्यांचे विशेष प्रमाणपत्र प्रशिक्षण आयोजिले आहे. मेडिकल कोडिंगचे कौशल्य असणाऱ्यांना अमेरिका, इंग्लंड तसेच इतर देशांमध्ये मोठी मागणी आहे. ही उत्तम संधी असून यात टेक महिंद्रा स्मार्ट हेल्थकेअर ॲकॅडमीद्वारे उद्योगमान्य सर्टिफिकेट व करिअर मार्गदर्शन होणार आहे; तसेच प्लेसमेंटसाठी सहकार्य केले जाणार आहे. याबाबत अधिक माहिती देणारा विनामूल्य ऑनलाइन वेबिनार २० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजिला आहे. यात विद्यार्थी व पालकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.