‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच एक हजार बस

‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच एक हजार बस

Published on

पुणे, ता. १४ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात एक हजार बस दाखल होणार असून, याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये ५०० बस खरेदीसाठी पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका निधी देणार आहे, तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) स्वतंत्रपणे ५०० बस घेतल्या जाणार आहे. संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे.
शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. खासगी गाड्यांऐवजी सार्वजनिक बसचा वापर केल्यास कोंडीतून काही प्रमाणात सुटका होऊ शकते. जास्तीत जास्त नागरिकांनी ‘पीएमपी’ची सेवा वापरावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असले तरी बसची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक बसची दुरवस्था झालेली असतानाही त्या रस्त्याने धावत आहेत, त्यामुळे बस बंद पडण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे ही बस खरेदी महत्त्वाची आहे. या एक हजार बस ‘सीएनजी’वरच्या असणार आहेत. त्यांची लांबी १२ मीटर इतकी असणार आहे. प्रत्येक बसची किंमत साधारणतः ४८ लाख इतकी असण्याची शक्यता आहे. ‘पीएमआरडीए’कडे २३० कोटींची तरतूद उपलब्ध आहे.


खरेदीचा तपशील
- पुणे व पिंपरी-चिंचवडची बस खरेदी
- पुणे महापालिकेचा वाटा : ६० टक्के
- पिंपरी महापालिकेचा वाटा : ४० टक्के
- पुणे मनपाच्या बस : ३०० (खर्च १४४ कोटी)
- पिंपरी चिंचवडच्या बस : २०० (खर्च ९६ कोटी)
- ‘पीएमआरडीए’ची बस खरेदी : ५०० बस
- ‘पीएमआरडीए’कडील तरतूद : २३० कोटी

दृष्टिक्षेपात
१) ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यातील बस ः १,९१६
२) दैनिक प्रवासी संख्या: सुमारे १२ लाख प्रवासी
३) नादुरुस्त बस ः ३०० ते ३५०
४) शहरासाठी आवश्यक बस ः ६ हजार

पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ५०० आणि ‘पीएमआरडीए’तर्फे ५०० बस खरेदी करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू होऊन लवकरच या बस ताफ्यात समाविष्ट होतील.
- राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com