‘कांगारू केअर’पद्धतीला रूग्णालयांकडून प्रोत्साहन
पुणे, ता. ६ : प्रसूतीनंतर आईने आपल्या बाळाला कांगारूप्रमाणे आपल्या छातीजवळ ठेवण्याच्या प्रक्रियेला ‘कांगारू मदर केअर’ म्हणतात. हे नवजात बाळाचे संरक्षण करते व या पद्धतीअंतर्गत आई बाळाला जास्त काळ स्तनपान करू शकते. त्याचवेळी बाळही स्तनपान करण्यास शिकते. यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विकास होण्यास मदत होते व यासोबतच मुलाचे विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होत असल्याने शहरातील रुग्णालये या पद्धतीला स्वीकारताना दिसून येत आहेत.
वैद्यकीय भाषेत याला ‘स्कीन टू स्कीन कॉन्टॅक्ट’ असे म्हणतात. सर्व नवजात बाळाच्या बाबतीत या पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. अकाली तसेच सामान्य प्रसूती होऊन जन्मलेल्या बाळाच्या तब्येतीची नीट काळजी घेण्यासाठी कांगारू केअर हे तंत्र उपयुक्त ठरते. बाळाची नीट काळजी घेण्याचा आणि बाळासोबत आपले बंध निर्माण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. या पद्धतीचा वापर करून शुश्रूषा करण्यात आलेल्या बाळांची पालकांसोबत खूप जास्त जवळीक निर्माण होते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ देतात. म्हणून शहरातील रुग्णालये त्यांच्या प्रसूतिगृहाच्या बाहेर याचा कक्ष तयार करत आहेत.
कांगारू केअरमध्ये काय होते?
कांगारू केअरमध्ये बाळाला आईच्या छातीशी घट्ट चिकटवून ठेवले जाते, अगदी कांगारूच्या पिशवीसारखे. यामध्ये बाळाला सरळ स्थितीत, तुमच्या उघड्या छातीवर, फक्त डायपर आणि डोक्यावर टोपी घालून ठेवतात. त्यानंतर बाळाला वरून उबदार ब्लँकेटने झाकले जाते. आईच्या त्वचेशी येणारा हा संपर्क बाळाला गर्भाशयाबाहेरील जीवनाशी जुळवून घेण्यास मदत करतो. कांगारू केअर हे बाळामध्ये उबदारपणा, आराम आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करते.
...................
कांगारू केअर बाळाशी बंध निर्माण करण्यास मदत करते. आईच्या दुधाचे उत्पादन वाढवते आणि बाळ आणि पालक दोघांमधील ताण कमी करते. यामध्ये येणाऱ्या त्वचेच्या संपर्काद्वारे ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिनसारख्या संप्रेरकांना उत्तेजित करून आईच्या दुधाचे उत्पादन वाढविण्यास मदत होते. यामुळे स्तनपान करणेदेखील सोपे होते. अशा स्थितीत बाळ स्तनपान चांगल्या प्रकारे करते आणि त्यांना अधिक प्रभावीपणे दूध पाजता येते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कांगारू मदर केअर हे स्तनपान लवकर सुरू करण्यास प्रोत्साहन देते.
- डॉ. अनुषा राव, नवजात शिशू आणि बालरोगतज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल, औंध
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.