‘एनपीडब्ल्यूए फार्मोत्सव’ उत्साहात

‘एनपीडब्ल्यूए फार्मोत्सव’ उत्साहात

Published on

पुणे, ता. ७ : ‘‘भारतात फार्मसी क्षेत्रातील बेरोजगारी वाढत असताना, विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करूनच औषधनिर्मिती क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार होईल,’’ असे मत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य विजय पाटील यांनी केले. नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (एनपीडब्ल्यूए) आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे आयोजित ‘फार्मोत्सव २०२५’ गौरव समारंभात ते बोलत होते.
तंत्रशिक्षण मंडळात प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विजय पाटील आणि पुणे विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, तर कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. संजय चोरडिया होते.
सोहळ्यात विविध पुरस्कार वितरित करण्यात आले. डॉ. एच. एम. कदम पुरस्कार प्रा. पोपट जाधव यांना, एनपीडब्ल्यूए पुरस्कार २०२५ सचिन इटकर व डॉ. राजेंद्र पाटील यांना, तर एनपीडब्ल्यूए वृक्षमित्र पुरस्कार २०२५ चंद्रकांत वारघडे यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवंत पुरस्कारांत सारिका कोडाळकर हिने प्रथम क्रमांक ११ हजार एकशे अकरा रुपये, लुबना शेख व स्वगता फडे यांनी द्वितीय क्रमांक ७ हजार सातशे सात रुपये, तर दीपाली पाटील हिने तृतीय क्रमांक ५ हजार पाचशे पंचावन्न रुपये पटकावले. प्रास्ताविक प्रा. प्रवीण जावळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तस्लिम कुरेशी व प्रा. सारिका झुंबड यांनी केले, तर आभार प्राचार्य डॉ. नरहरी पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com