अवती भवती
रोटरी क्लबच्या वतीने
विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
पुणे, ता. ४ : रोटरी क्लब पुणे युनिव्हर्सिटी, रोटरी क्लब सहवास व रोटरी क्लब मिड इस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने परदेशात शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आवश्यक त्या तांत्रिक बाबी व अन्यविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष विशाल कुलकर्णी, सहवासच्या अध्यक्ष रूमा आगवेकर, मिड इस्टचे अध्यक्ष रोहन चुंबळकर, मार्गदर्शक डॉ. दीपक शिकारपूर, माजी प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर, मधुरा विप्रा, डॉ. तुषार देवरस, डॉ. रवींद्र उद्गीकर, डॉ. विशाल चोरडिया उपस्थित होते.
..........
बहुजन हिताय संघातर्फे
साठे जयंतीनिमित्त उपक्रम
पुणे, ता. ४ : बहुजन हिताय संघ व प्रबुद्ध बुद्ध विहार यांच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात साठे यांच्या जीवनावरील विजय चौरे यांनी सादर केलेल्या गीताने झाली. वक्ते भीमराव वाघमारे व प्रकाश वाघमारे यांनी साठे यांच्या कार्याची माहिती सांगितली. या वेळी संघाचे अध्यक्ष अशोक औचरे, महेंद्र जाधव, डॉ. सुरेश कठाणे, मिलिंद बाराथे, विजय बागडे, अलका गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन सुजाता बाराथे यांनी केले. कोंडिबा धिवार यांनी आभार मानले.
.........
मातंग सेवा संघातर्फे
विविध विधायक उपक्रम
पुणे, ता. ४ : अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग सेवा संघाच्या वतीने सारसबाग येथील पुतळाच्या परिसरात विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. कार्यक्रमात आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिका अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली, तसेच नागरिकांना कोणत्या योजनांना आपण पात्र आहात यासंदर्भात माहितीपत्रके वाटली. या उपक्रमाचे आयोजन पहिलवान अनिल भिसे यांच्या पुढाकाराने व माजी नगरसेवक सम्राट थोरात यांच्या संयोजनाने झाले.
....
उद्योजकता विकास केंद्र,
यशस्वी ॲकेडमीत करार
पुणे, ता. ४ : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व यशस्वी ॲकेडमी फॉर स्किल्स यांच्यात कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उद्योजकता विकास करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारानुसार केंद्रांचे विविध प्रशिक्षण उपक्रम यशस्वी संस्थेतर्फे राबविण्यात येणार आहेत. या करारामुळे ब्युटी अॅड वेलनेस, हॉस्पिटॅलिटी (हॉटेल इंडस्ट्री), फॅशन डिझायनिंग, संगणक प्रशिक्षण आदी क्षेत्रात उद्योजक होण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वी संस्थेकडून देण्यात येणार आहे, असे केंद्राचे विभागीय अधिकारी डॉ. अभिराम डबीर यांनी सांगितले. या वेळी केंद्राच्या नागपूर विभागाचे विभागीय अधिकारी हेमंत वाघमारे, केंद्राच्या छत्रपती संभाजीनगरचे समन्वय विभागप्रमुख प्रदीप इंगळे, केंद्राच्या पिंपरी चिंचवड विभागाचे प्रकल्प अधिकारी मदनकुमार शेळके आदी उपस्थित होते.
.........
जन संघर्ष समितीतर्फे
संयुक्त जयंती उत्सव
पुणे, ता. ४ : जन संघर्ष समितीतर्फे क्रांतिसिंह नाना पाटील व अण्णा भाऊ साठे यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड फत्तेसिंह पवार हे होते. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, हरिश्चंद्र टिकेकर, विमल टिकेकर, कांतिलाल गवारी यांनी मनोगतातून क्रांतिसिंह व साठे यांच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी अॅड. मोहन वाडेकर, संतोष पवार, दत्तात्रेय जाधव, अभिजितराजे भोसले, अॅड. संदीप ताम्हणकर, शशी धीवर, चंद्रकांत शेडगे, विनायक गाडे उपस्थित होते. प्रसोनजीत जगदेव यांनी जलसा सदर केला. समितीचे अध्यक्ष अॅड. रवींद्र रणसिंग यांनी स्वागत, तर अॅड विकास देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मुकुंद काकडे यांनी केले, तर संदीप बर्वे यांनी आभार मानले.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.