‘व्हीआयटी’चा पदवी प्रदान समारंभ उत्साहात

‘व्हीआयटी’चा पदवी प्रदान समारंभ उत्साहात

Published on

पुणे, ता. १८ : वेल्लोर येथील ‘व्हीआयटी’ विद्यापीठाचा ४०वा पदवीप्रदान समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. कुलपती डॉ. जी. विश्‍वनाथन आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. महादेवन या वेळी उपस्थित होते. २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र व्हावे यासाठी शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत डॉ. विश्‍वनाथन यांनी या वेळी व्यक्त केले.
पदवीप्रदान समारंभात ६८ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देण्यात आली, तसेच ४५१ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली. २०३ विद्यार्थ्यांचा ‘रँकिंग’साठी गौरव करण्यात आला, तर एकूण ८,३१० विद्यार्थ्यांना पदवी व २,८०२ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या वेळी व्हीआयटीचे उपाध्यक्ष शंकर विश्वनाथन, सेकर विश्वनाथन आणि जी. व्ही. सेल्वम, विश्वस्त रमणी बालसुंदरम, कार्यकारी संचालक संध्या पेंटारेड्डी, सहायक उपाध्यक्ष कादंबरी एस. विश्वनाथन, कुलगुरू व्ही. एस. कांचना भास्करन, सहयोगी कुलगुरू पार्थसारथी मल्लिक आणि कुलसचिव टी. जयबराथी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com