पेशव्यांच्या इतिहासाचा अनोखा जागर

पेशव्यांच्या इतिहासाचा अनोखा जागर

Published on

पुणे, ता. १८ ः भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर, गगनभेदी गर्जना, पाऊस अशा वातावरणात इतिहासाच्या पाऊलखुणा वर्तमानाला साद घालत होत्या. पेशव्यांच्या देदीप्यमान व गौरवशाली इतिहासाचे स्मरण करताच पुन्हा एकदा शनिवार वाडा थोरल्या बाजीराव पेशव्यांची विजयगाथा सांगू लागला. निमित्त होते थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२५व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि इतिहास प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त सोमवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमणबाग प्रशालेत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे ‘रणधुरंधर बाजीराव पेशवे’ या विषयावर व्याख्यान झाले. ज्येष्ठ लेखक श्याम भुर्के, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे डॉ. शरद आगरखेडकर, पेशवे कुटुंबीय, पांडुरंग बलकवडे, अशोक गुंदेचा, मिलिंद एकबोटे, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, माधव गांगल, विश्वनाथ भालेराव, चैतन्य जोशी, मयुरेश अरगडे, डॉ. सचिन बोधनी आदी उपस्थित होते.

शोभायात्रेत अवतरले श्रीमंत पेशवे
सकाळी नऊच्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत शिस्तबद्ध संचलन करणारे विद्यार्थी, ढोल ताशांचा निनाद, भगवे झेंडे घेतलेले विद्यार्थी, ‘बाजीराव पेशव्यांचा विजय असो’ अशा घोषणा देत होते. शोभायात्रेत घोड्यावर स्वार झालेले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांच्या वेशातील कलाकारांना पाहून पेशव्यांचा इतिहास पुन्हा जिवंत झाल्याची अनुभूती आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com