चित्रपट-नाटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी समिती ः आशिष शेलार

चित्रपट-नाटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी समिती ः आशिष शेलार

Published on

पुणे, ता. १८ ः राज्यभरातील बंद पडत चाललेल्या एकपडदा चित्रपटगृहांच्या समस्या आणि नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग वगळून मराठी चित्रपट दाखविण्याचे धोरण ठरविण्याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाला शेलार यांनी हे आश्वासन दिले. नाट्य-चित्रपट क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाने शेलार यांची भेट घेतली होती. या वेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष नितीन धवणे, एकपडदा चित्रपटगृह संघटनेचे अध्यक्ष नितीन दातार, तमाशा परिषदेचे अध्यक्ष मोहित नारायणगावकर, संभाजी जाधव, मराठी चित्रपट वितरक चंद्रकांत विसपुते, दिग्दर्शक शिरीष राणे आदी उपस्थित होते.
विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचा आदेश शेलार यांनी संबंधित विभागाला दिला. तसेच, नाशिकमधील मुंडेगाव तालुक्यातील जमीन चित्रपटनगरीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पाठवलेल्या मराठी चित्रपटांना अनुदानात थेट अ-वर्ग देण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com