पुणे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे, ता. २० : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२४’ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे.
उमेदवारांचे पात्रता प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक मुंबई यांचे कार्यालयाकडे १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत हस्त पोहोच देण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ या संकेतस्थळावरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह परीक्षा दिलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण निरीक्षक मुंबई यांचे कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले.