सार्वजनिक सुट्टी दिवशीही भरता येणार मिळकतकर

सार्वजनिक सुट्टी दिवशीही भरता येणार मिळकतकर
Published on

पुणे, ता. २७ ः आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दोन दिवसात शनिवार (ता. २९), रविवार (ता. ३०) आणि सोमवारी (ता. ३१) सुट्टी आहे. मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, शनिवारी आणि रविवारीही नागरिकांना मिळकतकर भरता येणार आहे. नागरी सुविधा केंद्रे दोन्ही दिवशी सुरू राहतील. तसेच, नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून कर भरता येईल.

महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून मार्च महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत अधिकाधिक कर महापालिकेच्या तिजोरीत येण्यासाठी काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी कर आकारणी विभागाकडून अनेक विशेष पथके तयार करून त्यांच्याकडे कर वसुलीची जबाबदारी सोपवली आहे. महिलांचेही एक पथक तयार करून मिळकतकर वसुलीला प्राधान्य देण्यास सुरुवात केली होती. तसेच, कर आकारणीच्या प्रलंबित प्रकरणांचाही निपटारा करण्यास प्राधान्य दिले जात आहे. तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असणारी पाचशेहून अधिक मिळकतींच्या प्रकरणांचा विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी निपटारा केला. मिळकतकराचे बिल मिळाल्यानंतर तत्काळ भरणा करू शकणाऱ्या मिळकतकरधारक आणि व्यावसायिकांच्या बिलांना प्राधान्य दिले जात आहे. मिळकतकराचे बिल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ भरणाही सुरू झाला आहे.

दरम्यान, मिळकतकर भरण्यासाठी ३१ मार्च हा अखेरचा दिवस असतो. बहुतांश नागरिक अखेरच्या टप्प्यांत करभरणा करण्यास प्राधान्य देतात. या वेळी २९ मार्चला शनिवार, ३० मार्चला रविवार, तर ३१ मार्चला रमजान ईदची सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे थेट भरणा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी करसंकलन आणि करआकारणी विभागाने यादिवशीही सेवा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. थकबाकीदारांनी दोन टक्के व्याज टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत कर भरावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले.

अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करून बिले काढून कर वसूल केला जात आहे. सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. ग्राहक सेवा केंद्रांबरोबरच नागरिकांना विविध प्रकारे ऑनलाइन माध्यमाद्वारेही कर भरता येईल.
- प्रतिभा पाटील, उपायुक्त, कर आकारणी व करसंकलन विभाग, महापालिका

ग्राहक सेवा केंद्रांची वेळ...
- शनिवार व रविवार ः सकाळी १० ते सायंकाळी ७
- सोमवार ः सकाळी १० ते रात्री १०

ऑनलाइन भरणा करण्यासाठी माध्यमे
नेट बॅंकींग, क्रेडिट कार्ड, डेबीट कार्ड, भारत क्‍युआर कोड, गुगल-पे, फोन-पे, पोस्ट डेबिट कार्ड, पोस्ट क्रेडिट कार्ड, यूपीआय, ईबीपीपी, मोबाईल वॉलेट.

दृष्टिक्षेपात..
- २५ मार्चपर्यंत जमा झालेली मिळकतकर - २ हजार २२९ कोटी रुपये
- समाविष्ट ३२ गावातून जमा झालेली मिळकतकर - ४५० कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com