सरकारी इस्टिमेशन प्रशिक्षण

सरकारी इस्टिमेशन प्रशिक्षण

Published on

पुणे, ता. १९ : शासकीय कामांचे मूल्यनिर्धारण, इस्टिमेशन हे बांधकाम, स्थापत्य विभागातील, कंत्राटदार, विद्यार्थ्यांना उपयुक्त असे प्रशिक्षण २४ मे रोजी आयोजिले आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, एसएसआर, रेट, नियमावली, टेस्टिंग, व्यवस्थापन पत्रक, रेट तपासणी, चार्ट, इस्टिमेशन सॉफ्टवेअर व इस्टिमेशन बनविणे, समाज मंदिर, सभा मंडप, शाळा, अंगणवाडी, सुरक्षा भिंत अशा प्रकारचे कामे व इस्टिमेशन आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
संपर्क : ९३५६९७३४२७

डिजिटल चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम
चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणारा तीन महिन्यांचा आठवड्याच्या शेवटी चालणारा अभ्यासक्रम २४ मेपासून सुरु होत आहे. यात ८० टक्क्यांपेक्षा जास्त अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर आधारित असून यामध्ये विद्यार्थ्यांकडून लघुपट निर्मिती केली जाणार आहे. अभ्यासक्रमात चित्रीकरणाचे तंत्रज्ञान, संकलन, व्हीएफएक्स इफेक्ट, संकल्पना, कथालेखन, पटकथा निर्मिती आणि चित्रपट प्रदर्शन इत्यादी अनेक घटकांवर मार्गदर्शन होणार आहे. अभ्यासक्रम चित्रपटसृष्टी तसेच दूरचित्रवाणी क्षेत्रातील २५ हून जास्त वर्षांचा अनुभव असलेले दिग्दर्शक शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जाणार आहे. प्रत्यक्ष चित्रीकरण स्थळाला भेटीचे आयोजन आहे.
संपर्क : ८४८४८२२१६६

ॲमेझॉनवर विका उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणती कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ३१ मे रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, सवलती कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

शिका जर्मन भाषा
जर्मन ही अशी आंतरराष्ट्रीय भाषा जी शिकल्याने भरपूर करिअर संधी उपलब्ध होतात. याचे कारण जर्मनी ही युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि कॉर्पोरेशन हे जर्मन आहेत. भारत ही त्यांची वाढती बाजारपेठ असल्याने जर्मन भाषा अनुवादक, जर्मन दुभाषी आणि जर्मन प्रशिक्षकांना भारतात नेहमीच मागणी होती आणि पुढेही राहणार आहे. जर्मन शिकल्याने रेझ्युमेला वजन प्राप्त होते आणि नोकरीच्या बाजारपेठेतील रोजगार क्षमता वाढते. जर्मनीमध्ये जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. या सर्व संधींचा लाभ घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी जर्मन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे. जर्मन भाषेचा १२० तासांचा (लेव्हल ए-१ व लेव्हल ए-२) प्रमाणपत्र अभ्यासक्रम २ जूनपासून सुरु होत आहे.
संपर्क : ८४८४८२२१६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com