‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता
पुणे, ता. २४ ः ‘इश्क सुफियाना’, ‘कमली’, ‘धूम मचाले’, ‘मनवा लागे’, ‘है शोना’ अशा एकापेक्षा एक बहारदार गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘देसी गर्ल’ म्हणजे सुनिधी चौहान. हिंदी चित्रपटसृष्टीतील या आघाडीच्या गायिकेच्या पुण्यातील मैफिलीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ अंतर्गत ‘सुनिधी चौहान-आय ॲम होम’ या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे ही भव्य मैफील होणार आहे. या मैफिलीसाठी ‘सुहाना मसाले’ हे मुख्य प्रायोजक असून विश्वकर्मा विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ हे सहप्रायोजक आहेत. तसेच, व्हीटीपी रिअल्टी, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट्स आणि सूर्यकांत काकडे व असोसिएट्स हे सहयोगी प्रायोजक आहेत.
सुनिधी चौहान यांनी वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी ‘मेरी आवाज सुनो’ या दूरदर्शनवरील स्पर्धेत विजेतेपद पटकावत संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या गायकीचा ठसा उमटवला. ‘रमैय्या वस्तावैय्या’, ‘मस्त’, ‘फिजा’ या चित्रपटांपासून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. ‘शीला की जवानी’, ‘कमली’, ‘देसी गर्ल’, ‘बीड़ी जलाईले’, ‘धूम मचाले’, ‘हे शोना’, ‘बिन तेरे’ अशा अनेक गाजलेल्या गाण्यांनी त्यांनी रसिकांना श्रवणानंद दिला.
सुनिधी यांची ध्वनीमुद्रित गाणी ऐकणे, हा आनंदाचा भाग असला तरी त्यांना प्रत्यक्ष मैफिलीत ऐकणे, हा निराळा आणि अविस्मरणीय अनुभव असतो. ऊर्जेने भारलेले त्यांचे सादरीकरण आणि संगीतासह नृत्याचा संगम, यामुळे त्यांची मैफील कानांसह डोळ्यांचेही पारणे फेडणारी असते. देश-विदेशात त्यांनी अशा शेकडो मैफीली सादर केल्या आहेत. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना भावणारी ही मैफील आता पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
हे लक्षात ठेवा
या मैफिलीची तिकिटे districtbyzomato.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच, सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनदेखील तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. रसिकांनी लवकरात लवकर तिकिटे आरक्षित करावीत, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

