आपत्तीच्या काळात शाळांना तातडीचा निधी
पुणे, ता. २५ ः नैसर्गिक आपत्तीमुळे शाळेच्या इमारतीचे नुकसान झाल्यास दुरुस्ती किंवा नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी निधीची वाट पाहावी लागणार नाही. जिल्हा परिषदेने यासाठी अर्थसंकल्पात ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शाळांना तातडीचा निधी मिळेल.
जिल्ह्यातील डोंगराळ भागातील शाळांचे पावसाळ्यात किंवा वादळ, पूर, भूकंप, ढगफुटी अशा नैसर्गिक संकटांत मोठे नुकसान होते. छत उडून जाते. भिंती कोसळतात. पावसाच्या पाण्याने लाकडी व शैक्षणिक साहित्याचे नुकसान होते. आधी अशा परिस्थितीत शाळा आणि शिक्षण विभागाला संबंधित विभागांकडून निधी उपलब्ध होण्यासाठी आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी मोठ्या प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते. या तरतुदीमुळे शाळांना वेळ खर्च करावा लागणार नाही.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अर्थसंकल्पीय भाषणात शिक्षण विभागासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करून आपत्कालीन काळात निधी तातडीने वापरता येईल, अशी घोषणा केली. हा निधी प्राथमिक शिक्षण विभागाकडे राहील. शाळांच्या गरजेनुसार त्याचा वापर होईल.
दरम्यान, स्वतंत्र लेखाशीर्षात दिलेला निधी काही दिवसांनी अंगणवाडीसह इतर कुठल्याही विभागाला आपत्तीच्या काळात वापरता यावा म्हणून बांधकाम विभागाकडे देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कुठल्याही इमारतीचे आपत्तीच्या काळात नुकसान झाल्यास हा निधी वापरता येईल.
---
आपत्तीच्या काळात शाळांचे नुकसान झाल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. निधी मंजुरीची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यामुळे तातडीने मदत मिळेल. याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण व आदिवासी भागांतील शाळांना होईल. वर्गखोल्या किंवा इतर दुरुस्तीची कामे तातडीने करणे त्यामुळे शक्य होईल.
- चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

