‘हुक्का पार्लर’चे परवाने 
रद्द करणार ः फडणवीस

‘हुक्का पार्लर’चे परवाने रद्द करणार ः फडणवीस

Published on

पुणे, ता. २५ : ‘‘कायद्याने हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोणी हॉटेलमध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येतील,’’ अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

पुणे शहरात अनेक ठिकाणी विशेषतः महाविद्यालय परिसरात हुक्का पार्लर हॉटेल बेकायदेशीर चालवली जातात. त्याठिकाणी हुक्काच्या नावाखाली ड्रग्ज, गांजा तसेच, अमली पदार्थ मुलांना दिले जातात. त्यामुळे तरुणपिढी व्यसनाधीन होत आहे. पुण्यात अनेक ठिकाणी हा प्रकार सुरू असून, अशा हुक्का पार्लरला कोरेगाव पार्क तसेच, परिसरात परवानगी दिली आहे का, असा प्रश्‍न आमदार सुनील कांबळे यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
फडणवीस म्हणाले की, ‘‘हुक्का पार्लरचे प्रस्थ रोखण्यासाठी २०१८ मध्ये कायदा करण्यात आला. आता त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. पहिल्यांदा कारवाईत हुक्का सापडल्यास तीन वर्षे शिक्षा आहे. मात्र, आता कायद्यात सुधारणा केली जाणार असून, दुसऱ्यांदा हुक्का सापडल्यास सहा महिने हॉटेल अथवा रेस्टॉरंट परवाना रद्द करणे, तिसऱ्यांदा हुक्का सापडल्यास कायमचा परवाना रद्द करणे आणि संबंधितावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com