मान्यतेबाबत शाळांची ‘जिप’ करणार तपासणी
पुणे, ता. २५ ः ‘एसएससी’ बोर्डाची मान्यता असताना शहरातील काही शाळा ‘सीबीएसई’ची जाहिरात करून पालकांची फसवणूक करीत आहेत. ते थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पथके स्थापन करून तपासणी करणार आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी ही माहिती दिली. अशा शाळांत पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. एका शाळेच्या बाबतीत हा प्रकार निदर्शनास आला आहे. शहरालगतच्या शाळांमध्ये असे प्रकार जास्त होत आहेत.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि हवेली, मुळशी, खेड या भागांतील सर्व शाळांची मान्यता तपासली जाईल. त्यासाठी विशेष पथके आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल. असे प्रकार आढळल्यास शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही नाईकडे यांनी दिला.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

