देशाला सर्वसमावेशक उपचारांची गरज

देशाला सर्वसमावेशक उपचारांची गरज

Published on

पुणे, ता. २५ : ‘‘भारतीय पारंपरिक ग्रंथ जसे अथर्ववेद, सुश्रुत चिकित्‍सा यातील ज्ञान हे परिपूर्ण आहे. मात्र हेच ज्ञान परकी देशांनी आत्‍मसात करून त्‍याला वेगळे नाव देऊन त्‍यांचेच संशोधन असल्‍याचे खपवले जात आहे. जीवनशैलीतील योग्‍य बदलाने औषधविरहित, आरोग्‍यपूर्ण जीवन जगणे शक्‍य असून, देशाला सर्वसमावेशक उपचारांची गरज असून, त्‍याचा प्रचार व प्रसार वाढायला हवा,’’ असे मत आंतरराष्‍ट्रीय हृदयरोगतज्‍ज्ञ डॉ. बिंदुकुमार कान्सुपाडा यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्‍यक्‍त केले.
दुसऱ्या देशातील नागरिकांवर वैद्यकीय संशोधन केले जाते व त्‍याद्वारे तयार केलेले औषधे आंधळेपणाने भारतीयांवर लादले जाते. आपले शरीरवैशिष्ट्ये वेगळी आहेत. ते आपल्‍याकडे पूर्णपणे लागू होईलच असे नाही. मात्र यातून फायदा औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्‍यांचा होतो. परंतु आपले पारंपरिक ज्ञान हे खूप उपयुक्‍त आहे. आपल्‍याला केवळ ॲलोपॅथीचे नव्‍हे, तर सर्व पॅथींचा समावेश असलेल्‍या नैसर्गिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्वसमावेशक उपचारांची गरज असल्‍याचे त्‍यांनी अधोरेखित केले.
डॉ. कान्सुपाडा म्‍हणाले, ‘‘हृदयाचे आरोग्य, मधुमेह नियंत्रण, उच्च रक्तदाब कमी करणे आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे आहेत. योगासने किंवा हलका व्यायाम करा. ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम प्रभावी ठरतात. योग, ध्यान, संतुलित आहार आणि तणावरहित जीवनशैली हे हृदय व एकूणच शरीरासाठी सर्वोत्तम औषध आहे. येणाऱ्या काळात टेलिमेडिसीन खूप उपयुक्‍त ठरेल. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्‍यांना आहाराबाबत तसेच मनोचिकित्‍सेबाबत शिक्षण द्यायला हवे.

महाराष्ट्रात राबविणार प्रकल्प
डॉ. कान्सुपाडा हे ‘व्‍हिल्‍स ग्‍लोबल फाउंडेशन’चे संचालक असून या संस्‍थेद्वारे गुजरातमधील अरावली जिल्ह्यातील सात गावांत सर्वांगीण विकास प्रकल्‍प राबविण्यात येत आहे. यात पाणी, आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, उपजीविका या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचा उद्देश असून, हा प्रकल्‍प महाराष्ट्रातील इतर गावांत राबविण्‍याचा मानसही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com