युद्धाची खुमखुमी सर्वत्र दिसतेय

युद्धाची खुमखुमी सर्वत्र दिसतेय
Published on

पुणे, ता. २७ : ‘‘युद्ध हा मानवाचा स्थायीभाव होत चालला असून युद्धाची खुमखुमी सर्वत्र दिसून येते. त्यामुळे आज जगभर संहार दिसून येतो,’’ असे मत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.
विजय लोणकर लिखित ‘सेपियन्सचा जनक : युवाल नोआ हरारी’ व डॉ. अनिल मडके लिखित ‘क्षयरोगावर मात’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन सांगली येथे डॉ. भवाळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ज्येष्ठ संपादक अरविंद गोखले, लेखक लोणकर, डॉ. मडके व विश्वकर्मा प्रकाशनचे संदीप तापकीर उपस्थित होते.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, ‘‘सेपियन्सचा जनक अत्यंत वाचनीय पुस्तक असून त्यामधून तिन्ही काळाचा वेध घेण्यात आला आहे. तर क्षयरोगावर मात पुस्तकामधून आरोग्याबाबत सजगता निर्माण केली आहे.’’ गोखले म्हणाले, ‘‘सध्या वाईट प्रवृत्तीच्या माध्यमातून अंधार पसरला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी अशा चांगल्या पुस्तकांची गरज आहे.’’
युवाल नोआ हरारी हा केवळ इतिहासकार नाही तर, तो आजच्या काळातील विचारवंत आहे. त्याचे भारताशी असलेले नाते, विपश्यनेकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन, कथाकथनाबद्दलचे त्याचे विचार हे सारे चकित करणारे आहे, असे लोणकर यांनी नमूद केले. मीना कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com