लाईव्ह न्यूज

‘स्किल स्कूल’अंतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण

‘स्किल स्कूल’अंतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण
Published on: 

पुणे, ता. १६ : शालेय विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाबरोबरच त्यांना अधिकाधिक रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्याधिष्टित प्रशिक्षण देणे, ही काळाची गरज आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व पुण्यातील ‘श्री मुकुंद भवन ट्रस्ट’ यांच्यातर्फे आणि चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज यांच्या सहकार्याने ‘सकाळ एनआयई’ (न्यूज पेपर इन एज्युकेशन) उपक्रमाच्या ग्रामीण भागातील दहा सभासद शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून कौशल्याधिष्टित प्रशिक्षणाचा ‘स्किल स्कूल’ प्रकल्प राबविण्यात येत आहे.

‘स्किल स्कूल’ प्रकल्पाची औपचारिक घोषणा पुण्यातील ‘सकाळ’ मुख्य कार्यालयात नुकतीच झाली. यावेळी ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार, ‘श्री मुकुंद भवन ट्रस्ट’चे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, मदन जैन, ‘सकाळ सोशल फाउंडेशन’चे विश्वस्त महेंद्र पिसाळ, शरद सारडा, आंबेगाव तालुका पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, शिक्षक ज्ञानेश्वर निमोणकर, प्रल्हाद चौधरी, अभिमन्यू भुजबळ, गोरक्षनाथ केदारी आदी उपस्थित होते.

‘स्किल स्कूल’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांमधील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पंधरा विविध रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्राथमिक स्तरावरील प्रात्यक्षिक स्वरूपात कार्यशाळांद्वारे वर्षभर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेला पंधरा कौशल्यांचे वेगवेगळे ‘टूल्स किट’ दिले जाणार असून, सुरुवातीला या उपक्रमाद्वारे काही विद्यार्थ्यांना विविध तुकड्यांमधून प्रशिक्षित करून नंतर इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे. वर्षाच्या शेवटी दहा शाळांमध्ये स्पर्धा आयोजित करून यशस्वी विद्यार्थ्यांच्या गटांचा आणि विजेत्या शाळांचा सन्मान करण्यात येणार आहे.

ही असणार पंधरा कौशल्ये
इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक कॉम्प्यूटर (वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉइंट), रोबोटिक्स (ड्रॉइंग रोबोट, वॉकिंग रोबोट व मून रोव्हर), ड्रोन निर्मिती (बेसिक), आर्टिफिशियल ज्वेलरी, फॅब्रिक ज्वेलरी, ब्युटी पार्लर, कारपेंटरी, प्लंबिंग, गार्डनिंग, रांगोळी, मेहंदी, कुकिंग (बेसिक), अ‍ॅलेक्सा डॉल मार्फत इंग्रजी व हिंदी भाषेचे प्रशिक्षण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com