आज पुण्यात १७ मे २०२५ शनिवार
आज पुण्यात १७ मे २०२५ शनिवार
.............................................
सकाळी ः
चित्रपट प्रदर्शन ः बेलवलकर सांस्कृतिक मंच व संभाषा फाऊंडेशन आयोजित ः जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त- ‘पुढचं पाऊल’ चित्रपटाचे प्रदर्शन ः राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, विधी महाविद्यालय रस्ता ः १०.३०.
पदग्रहण सोहळा ः भारतीय जनता मजदूर सेलतर्फे ः महाराष्ट्र राज्यस्तरीय समिती पदग्रहण सोहळा ः अध्यक्षा- ज्योती सावर्डेकर ः प्रमुख पाहुणे- विष्णुप्रिय रॉय चौधरी, अर्नब चटर्जी, संजय अग्रवाल ः द न्यू पूना क्लब लि, राजेंद्रसिंह रस्ता, कोरेगाव पार्क ः ११.००.
दुपारी ः
कोनशिला उद्घाटन समारंभ ः रामराज्य सहकारी बँक लिमिटेडच्या नवीन वास्तूचा कोनशिला उद्घाटन समारंभ ः हस्ते- अजित पवार ः अध्यक्ष- मुरलीधर मोहोळ ः उपस्थिती- माधुरी मिसाळ, चेतन तुपे, योगेश टिळेकर, रूपाली चाकणकर, विद्याधर अनास्कर ः ६३४, सुप्रीम प्लाझा सोसायटी, भारत ज्योती गॅसजवळ, बिबवेवाडी ः ४.३०.
चर्चासत्र ः इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सतर्फे ः जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त चर्चासत्र ः विषय- डिजिटल परिवर्तनात लैंगिक समानता ः एईएम सेमिनॉर हॉल, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर ः ४.००.
व्याख्यान ः मुक्तांगण विज्ञानशोधिका आयोजित ः विषय- ‘रिमोट सेन्सिंग’ ः वक्ते- डॉ. नटराज वाडादी ः मुक्तांगण विज्ञानशोधिका, सेनापती बापट रस्त्यानजीक ः ११.३०.
सायंकाळी ः
मुलाखत ः हिंदू महिला सभा आयोजित ः शाहू मोडक यांच्या पत्नी, उत्कृष्ट ज्योतिषी, हिंदी कवयित्री प्रतिभाताई शाहू मोडक यांची मुलाखत ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, गांजवे चौक ः ५.००.
व्याख्यान ः वक्तृत्वोत्तेजक सभा आयोजित ः वसंत व्याख्यानमाला (सुंदराबाई सुराणा स्मृती व्याख्यान) ः विषय- ‘भाषा, कविता आणि संस्कृती’ ः वक्त्या- डॉ. नीलिमा गुंडी ः टिळक स्मारक मंदिर प्रेक्षागृह, टिळक रस्ता ः ६.००.
गानमैफील ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कलाश्री’ आयोजित ‘सहेला रे...’ गानमैफील ः गायक- अभिषेक काळे, डॉ. राधिका जोशी ः भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता ः ६.००.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.