लागा प्रवेशाच्या तयारीला !
पुणे, ता. १६ : तुम्ही दहावीनंतर उपलब्ध असणाऱ्या अभियांत्रिकीसह तंत्रशास्त्र, वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र पदविका यासह अन्य तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशास इच्छुक आहात का? अहो, मग तुम्हाला प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत. कारण आता लवकरच या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
होय, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक प्रमाणपत्रे जाहीर करण्यात आली आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एसएससी अभियांत्रिकी/तंत्रशास्त्र, प्रथम वर्ष वास्तुकला, प्रथम वर्ष पोस्ट एचएससी औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम, तसेच प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी/तंत्रशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पदवी, प्रथम वर्ष फार्म डी, वास्तुशास्त्र, बी. प्लॅनिंग, बी. डिझाइन, बीबीए/बीएमएस/बीसीए हे पदवी अभ्यासक्रम यासह अन्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, एकात्मिक अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमधून करण्यात येतात. त्यासाठी अर्ज करताना संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीतील नमूद केलेल्या कागदपत्रांची तयारी करून ठेवावी, अशी सूचना तंत्र शिक्षण विभागाने केली आहे.
बनावट कागदपत्रे दिल्यास कारवाई
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये काही विद्यार्थ्यांनी प्रवेशादरम्यान काही प्रमाणपत्रे ही संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त करून न घेता बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचे आढळून आले होते. अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांकडूनच प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावीत. बनावट किंवा खोटी प्रमाणपत्रे प्रवेशासाठी सादर केल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द करून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील,’’ असा इशारा तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिला आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
- जात/जमात प्रमाणपत्र, जात/जमात वैधता प्रमाणपत्र
- अनुसूचित जाती/जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र
- दिव्यांगाचे प्रमाणपत्र
- आधार क्रमांक आणि संलग्न बॅंक खाते
- वर्किंग प्रोफेशनल्ससाठी अनुभव प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.