वास्तुशास्त्र नियोजनाविषयी कार्यशाळा

वास्तुशास्त्र नियोजनाविषयी कार्यशाळा
Published on

आयुष्यात यश, आरोग्य आणि आनंद मिळविण्यासाठी घराचे बांधकाम कसे करावे व घरातील वस्तूंची रचना कशी असावी हे सांगणारे प्राचीन तंत्र म्हणजे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र हे घर, इमारती किंवा मंदिरे बांधण्याचे प्राचीन भारतीय विज्ञान आहे, जे आधुनिक काळातील आधुनिक वास्तुकलेचे प्राचीन रूप मानले जाऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे आदींबाबत माहिती करून देणारी एक आठवडा चालणारी ऑनलाइन कार्यशाळा १३ ते १८ जानेवारीदरम्यान होणार आहे. नवीन घर बांधताना, नवीन जागा घेताना, सध्या राहत असलेल्या घरात कळत- नकळत दोष निर्माण झालेले असतील तर त्याचा परिणाम घरातील व्यक्तींवर होत असतो. घर-वास्तू दोषमुक्त असावे ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. यासह वास्तू सल्लागार म्हणून काम करण्यास इच्छुक असणारे, आर्किटेक्ट, इंटेरियर डिझायनर, सिव्हिल इंजिनिअर्स या शाखांचे विद्यार्थी यांच्यासाठी ही कार्यशाळा त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून फायद्याची ठरणार आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्त्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, चौकट रत्नाध्याय, वास्तूचे आयुष्य, घराचे कट व त्याचे घरावर होणारे परिणाम, वास्तू आणि व्यवसाय संधी आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

यू-ट्यूब आणि इंस्टाग्रामसह वाढवा व्यवसाय
स्वतःचा उद्योग, व्यवसाय, व्यापार पुढील स्तरावर नेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी चार तासांची ऑनलाइन व्यवसाय विकास कार्यशाळा १६ व १७ जानेवारी रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत स्वतःच्या उद्योग-व्यवसायाचा ब्रँड वाढविण्यासाठी यू-ट्यूब आणि इंस्टाग्राम कसे वापरायचे, प्लॅटफॉर्म अल्गोरिदम, ट्रेंड आणि सामग्री निर्मिती (कंटेंट क्रिएशन) समजून घेऊन शूटिंग, संपादन (एडिटिंग) आणि अपलोडिंग कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्पादन टॅगिंगद्वारे पैसे कसे कमवायचे आणि ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवायची, विविध यशोगाथा आणि भविष्यातील ट्रेंडपासून प्रेरणा कशी घ्यायची याबाबतही उपयुक्त माहिती दिली जाणार आहे. लहान व्यावसायिक, सेवा क्षेत्रात काम करणारे प्रोफेशनल्स, सामग्री निर्माते (कंटेंट क्रिएटर्स) आणि नव्या पिढीच्या टेक्नोसॅव्ही ग्राहकांना आकर्षित करू पाहत असलेल्या प्रत्येकासाठी आदर्श अशी ही कार्यशाळा असणार आहे. स्वतःच्या व्यवसायाची ऑनलाइन माध्यमांचा वापर करून भरभराट करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी मिळवून देणारी ही कार्यशाळा असणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

हाउसिंग सोसायटी मॅनेजर प्रशिक्षण
सध्या मागणी असणाऱ्या सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीनदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण १७, १८ व १९ जानेवारी रोजी आयोजिले आहे. ‘एसआयआयएलसी’ व पुणे हाउसिंग फेडरेशन यांच्या वतीने हे प्रमाणपत्र प्रशिक्षण होणार आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे, सॉफ्टवेअर प्रशिक्षण, चॅट जीपीटीचा वापर आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ९३५६९७३४२७

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com