

पुणे, ता. ७ : रागाने बघितल्याच्या कारणावरून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यात एकाच्या हाताचा पंजा तुटून वेगळा झाला. ही घटना बिबवेवाडीतील इंदिरानगर परिसरात सोमवारी (ता. ६) सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
गौरव राजेश मरकड (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि त्याचा मित्र पीयूष पाचकुडवे (वय २२, रा. सुपर इंदिरानगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गौरव मरकड याने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अल्पवयीन मुलासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मिथिलेश सरोज (वय २१, रा. वडकीनाला) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे आरोपींनी गौरव आणि त्याचा मित्र पीयूषला इंदिरानगरमधील शिवतेज क्रीडा संघ चौकात सायंकाळी बोलावून घेतले. तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. आरोपी सागर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने पीयूषवर कोयत्याने वार केले. त्या वेळी गौरव हा पीयूषला वाचविण्यासाठी गेला, परंतु आरोपींनी त्याच्याही डोक्यावर आणि खांद्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत माहिती मिळताच वानवडी विभागाचे साहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, बिबवेवाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.