श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाची गुणवत्ता अभियानांतर्गत पाहणी

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाची 
गुणवत्ता अभियानांतर्गत पाहणी
Published on

कोथरूड, ता. ८ : गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत येथील श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात शाळा तपासणी करण्यात आली. त्यासाठी आलेल्या पथकामध्ये महर्षी कर्वे शाळा विद्यापीठ शाखेचे विष्णू मोरे, रामराज्य विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी कामठे, भारती विद्यापीठ कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना देशमुख, एन. सी. एल मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सुजाता एन., हुजूरपागा कन्या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका अलका काळे, हिरामण बनकर विद्यालयाचे प्रा. शशिकांत शिंदे यांचा सहभाग होता. प्रशालेत भूगोल कक्ष, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडा विभाग, विविध विषयांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नागनाथ सानप, उपमुख्याध्यापक किसन बुचडे, शिक्षिका देवयानी पालवे आदी उपस्थित होते.

औंध मनपा शाळेत स्नेहसंमेलन
औंध, ता. ८ : येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५४ बी इंग्रजी माध्यम शाळेमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. बालवाडी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. मुख्याध्यापक संतोष सुतार व शिक्षकांच्या नियोजनामुळे हे संमेलन यशस्वीपणे पार पडले. यावेळी राहुल गोसावी, श्रीकांत ठाकूर, त्र्यंबक आगळे, अभय कदम, आरती गमरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षरा शेळके यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com