पानिपत शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन
पुणे, ता. ११ : शिंदे सरकार फाउंडेशनतर्फे वानवडीतील श्रीमंत महाराज महादजी शिंदे स्मारक (शिंदे छत्री) येथे १४ जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता २६५वा पानिपत शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पानिपतच्या पवित्र भूमीतील मातीच्या मंगल कलशाचे पूजन करून महादजी शिंदे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात येईल. त्यानंतर शूरवीरांना अभिवादन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, उल्हास पवार, जगदीश मुळीक, डॉ. ज्ञानेश्वर मुळीक, मंगेश कराड, उज्ज्वल चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांना निमंत्रित केले आहे, अशी माहिती पानिपत शौर्य दिन समितीचे प्रमुख उत्तमराव शिंदे सरकार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.