२२५ पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

२२५ पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

Published on

पीएमपीच्या २२५ कर्मचाऱ्यांचे रक्तदान
पुणे, ता. १७ : पीएमपीतर्फे नरवीर तानाजी वाडी येथील आगारामध्ये झालेल्या शिबिरात २२५ पीएमपी कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपीच्या सर्व डेपो, दोन्ही मुख्यालये तसेच मुख्य प्रशासकीय कार्यालय येथे प्रत्येक महिन्यात रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.
ससून रुग्णालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांनी या शिबिराचे उद्‍घाटन केले. यावेळी परिवहन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पवार-पोतदार, नरवीर तानाजी वाडी आगाराचे व्यवस्थापक संतोष किरवे, आगार अभियंता राजकुमार माने आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com