सिद्धार्थ शिरोळे

सिद्धार्थ शिरोळे

Published on

विद्यापीठ चौकातील पूल
१५ जूनपर्यंत खुले होणार
पुणे, ता. १८ ः सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या दुहेरी उड्डाणपुलांचे काम वेगात सुरू आहे. औंधकडून गणेशखिंडकडे जाणारा पूल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वाहनांसाठी खुला होईल. गणेशखिंड रस्त्याने बाणेर आणि पाषाणकडे जाणारा पूल १५ जूनपर्यंत सुरू करण्यात येईल. मेट्रोचा पूल आणि स्थानक बांधण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली. त्यांनी शनिवारी ‘पीएमआरडीए’च्या (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) अधिकाऱ्यांसमवेत विद्यापीठ चौकातील कामाची पाहणी केली. मुख्य अभियंता रिनाज पठाण, मेट्रोची उभारणी करणाऱ्या टाटा कंपनीचे अधिकारी, वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त नंदा वग्याणी, पोलिस निरीक्षक मीनल पाटील, सुनील गवळी, फौजदार नरेंद्र मुंढे यावेळी उपस्थित होते.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com