नदीपात्रातील उर्वरित अतिक्रमणांकडे दुर्लक्षच
पुणे, ता. १८ ः मुठा नदीपात्रातील भिडे पुलाजवळील अतिक्रमणांवर पुणे महापालिका प्रशासनाने अर्धवटच कारवाई केल्याची सद्यःस्थिती आहे. नदीपात्रातील सीमाभिंतीच्या पुढे खोल्या, पत्र्याचे शेड, यापूर्वीच्या कारवाईत काढलेल्या गोदामाचा राडारोडा जागेवरच आहे.
महापालिकेने दोनदा कारवाई केली, मात्र कारवाई सलग होत नसल्याने उर्वरित अतिक्रमणे अद्यापही तशीच आहेत. नारायण पेठेतून भिडे पुलाकडे जाताना डाव्या बाजूला सीमाभिंतीजवळच मागील काही वर्षांपासून अतिक्रमणास सुरवात झाली होती. तेथे पक्के बांधकाम केलेल्यांना वीजजोड, नळजोडही उपलब्ध करून देण्यात आले. मागील वर्षी पुरस्थितीनंतर नदीपात्रातील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला. हा प्रश्न ‘सकाळ’ने मांडला. त्यानंतर मागील महिन्यात बांधकाम विभागाने गोदाम काढले. त्यानंतर एका मंडळाची खोली, कबुतरांची ढाबळ यांच्या चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढाबळ काढली गेली. उर्वरित अतिक्रमणे काढण्यास मात्र अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सीमाभिंतीलगत व खासगी मालमत्तांच्या पाठीमागील बाजूस पत्र्याचे शेड, खोल्या आहेत. याबरोबरच यापूर्वीच्या पाडकामानंतरही लोखंडी सापळा, राडारोडा पडून आहे. मंडळाच्या खोलीतील वस्तूंमुळे कारवाई केलेली नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
---
पुणे महापालिकेने नदीपात्रात यापूर्वी दोन वेळा कारवाई करून अतिक्रमणे काढली आहेत. तिघांना नोटीस बजावली आहे. पोलिसांशी समन्वय ठेवून उर्वरित अतिक्रमणे काढली जातील. लोखंडी गर्डर, राडारोडाही तत्काळ उचलण्यात येईल.
अविनाश कामठे, महापालिका अभियंता
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

