चंदनाची चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात
पुणे, ता. १८ ः सिंहगड रस्ता भागात एका बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाचे ओंडके जप्त करण्यात आले.
भरत शिवाजी जाधव (वय ३४, रा. केडगाव चौफुला, गडदे वस्ती, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. धायरी भागातील एका बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. सिंहगड रस्ता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. वडगाव भागातील कॅनॉल रस्त्यावर एक जण थांबला असून, त्याच्याकडील पोत्यात चंदनाचे ओंडके असल्याची माहिती गस्त घालणारे पोलिस कर्मचारी शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडील पोत्याची तपासणी करण्यात आली, तेव्हा पोत्यात चंदनाचे ओंडके सापडले. जाधववर यापूर्वी यवत आणि हवेली पोलिस ठाण्यात चंदनाच्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

