महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचा वर्धापन दिन उत्साहात

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचा
वर्धापन दिन उत्साहात
Published on

पुणे, ता. २५ : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचा ८८ वा वर्धापनदिन नुकताच पार पडला. याप्रसंगी राजेश श्रीवास्तव लिखित ‘सीधा सत्य’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेचे अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमात हिंदी भाषेत लेखन करण्यासाठी संजय भारद्वाज आणि गुजरातीमध्ये लेखन करण्यासाठी डॉ. पुष्पा गुजराती यांनी गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी, मुंबई यांच्यातर्फे डॉ. प्रेरणा उबाळे यांना ‘मामा वरेरकर अनुवाद कास्य पुरस्कार’, प्रा. शशिकांत निघोजकर यांना ‘मामा वरेरकर अनुवाद रजत पुरस्कार’ मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले.
पवार म्हणाले, ‘‘या पुस्तकाचे प्रकाशक माझ्या हस्ते होत आहे, हे मी माझे सौभाग्य समजतो. जेव्हा मी वाडिया महाविद्यालयात शिकत होतो, तेव्हा मी आचार्य रजनीश यांची अनेक प्रवचने ऐकली आहेत. ते म्हणत होते की तुम्ही जे सुख समजता ते दुःख आहे, जे दुःख समजता ते सुख आहे.’’
या प्रसंगी कार्याध्यक्ष डॉ. नीला बोर्वणकर, सचिव प्रा. रविकिरण गळंगे आदी उपस्थित होते. प्रा. गळंगे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या ‘ज्ञानदा’ व्यासपीठाच्या संयोजक सुनेत्रा गोंदकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com