

पुणे, ता. २४ ः रात्री भरपावसात जंगलात पायी चालत, चिखल तुडवत आणि कोल्ह्यांचा हल्ला चुकवत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खंडित झालेला वीजपुरवठा दुरुस्त केला.
कामथडी (ता. भोर) ते पाबे (ता. राजगड) दरम्यान चाळीस किलोमीटर लांब ‘३३ केव्ही पाबे वीजवाहिनी’च्या तारांची दुरुस्ती करत सुमारे सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात महावितरणला यश आले. शुक्रवारी (ता. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास ‘३३ केव्ही पाबे वीजवाहिनी’च्या तारा तुटल्या. परिणामी ४१ गावे, वाड्या वस्त्यांमधील सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मात्र भरपावसात महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी जंगलातील चिखल तुडवत, कोल्ह्यांचा हल्ला चुकवत, अनेक धोके पत्करत रात्रभर वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे शनिवारी (ता. २४) सकाळच्या सुमारास वेल्हा, पाबे, वाजेघर आदींसह ४१ गावे व वाड्यावस्त्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. यामध्ये महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटूळे, वेल्हा शाखेचे कनिष्ठ अभियंता सचिन कुलकर्णी, समीर मुजावर, सूर्यकांत शिंदे, गणेश शिंदे, राहुल भुरूक, रवी कातुरडे, नीलेश शेंडकर, गणेश गायके, अमोल डांगे, चेतन चोरगे, अमोल रणभोरे यांचा सामावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.