पालखी मार्गावरील गावांत प्रशासनाकडून तयारी

पालखी मार्गावरील गावांत प्रशासनाकडून तयारी
Published on

पुणे, ता. २५ ः ‘‘पालखी मार्गावरील गावांत येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
पालखी सोहळ्यादरम्यान मुक्काम आणि विसावे गावांमध्ये करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची आणि नियोजनाची पाहणी पाटील यांनी केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, अप्पासाहेब गुजर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांच्यासह हवेली, दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यांचे गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात पालखीतळ व्यवस्थापन, गाव व परिसराची साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वारकऱ्यांचे निवास व निवारा कक्ष, महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी कक्ष, आरोग्य बूथ, शौचालय सुविधा, वाहतूक नियोजन, अखंड वीज पुरवठा, कचरा व्यवस्थापन आदी सुविधांची माहिती घेतली गेली. आवश्यक तेथे सुधारणा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शिल्लक असलेली कामे पाच जूनपर्यंत पूर्ण केली जातील. जेणेकरून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाहीत. यासाठी आवश्यक निधीची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com