

पुणे, ता. २५ ः धानोरी परिसरात विहिरीत उडी मारून ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आली आहे.
दशरथ पाचू बारवते (वय ६०, रा. भैरवनगर, आनंद पार्क, धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरीतील कुकरेजा सोसायटीच्या परिसरातील विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. बारवते यांचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती मुलाला दिली. बारवते यांनी आजारपणामुळे आत्महत्या केल्याची शक्यता आहे. ते बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती, अशी माहिती विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.