एसटीला पावसाचा फटका, प्रवासी घटले

एसटीला पावसाचा फटका, प्रवासी घटले
Published on

पुणे, ता. २४ ः पुण्यासह राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढल्याने प्रवाशांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवली आहे. त्याचा फटका एसटी प्रशासनाला बसला आहे. पुण्याहून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांमध्ये सुमारे ५० हजार प्रवाशांची घट झाली असून, दिवसाचे उत्पन्न सुमारे २५ लाखांनी घटले आहे.
सध्या सुट्टीचा हंगाम आहे. या काळात पुण्यासह राज्यभर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. मागच्या काही दिवसांत पावसाने राज्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. प्रवाशांनी प्रवास करण्याचे टाळले आहे. त्यामुळे एसटीला गर्दीचा हंगाम मोकळा जात आहे. स्वारगेट, वाकडेवाडी बस स्थानकावरून एसटी गाड्यांना तुरळक प्रतिसाद आहे. पुण्याहून मुंबई वगळता अन्य शहरांना जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. पुणे विभागात सरासरी दैनंदिन सुमारे तीन लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. यातून एका दिवसाचे सुमारे एक कोटी ७० ते ९० लाख रुपये असे उत्पन्न मिळते. मात्र प्रवासीसंख्या घटल्याने प्रवासी उत्पन्नदेखील सुमारे २५ लाखांनी घटले आहे, असे एसटीच्या पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com