पिस्तुलाचा धाक दाखवून 
पिता-पुत्राला मारण्याची धमकी

पिस्तुलाचा धाक दाखवून पिता-पुत्राला मारण्याची धमकी

Published on

पुणे, ता. २७ : किरकोळ वादातून माजी सैनिकाने पिस्तुलाचा धाक दाखवून पिता-पुत्राला जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावात घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी माजी सैनिकाला अटक केली आहे.
मनोज लक्ष्मण शेजवळ (वय ४४, रा. वलवा वस्ती) असे अटक केलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. याबाबत दत्तात्रेय जयवंत फडके (वय ५५) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडकी गावातील आश्रमशाळेजवळ रविवारी ही घटना घडली. शेजवळ याच्याकडे शस्त्र परवाना आहे. पोलिसांनी त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजवळ हा सैन्य दलातून निवृत्त झाला आहे. फिर्यादी फडके आणि शेजवळ शेजारी राहतात. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ते मित्राच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी जेजुरीला गेले होते. तेथे शेजवळ आला होता. मस्करीतून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यातून शेजवळ याने फडके यांना मारहाण केली. ‘तुला आणि तुझ्या पोराला जिवे मारून टाकतो’, अशी धमकी त्याने दिली. फडके यांनी शेजवळला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. फडके यांचा मुलगा प्रणिलने मारहाणीच्या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. शेजवळने त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने दुचाकीच्या डिक्कीतून पिस्तूल काढले. फडके यांच्यावर पिस्तूल रोखले. ‘दोघांना गोळ्या घालून मारून टाकीन, आजच्या आज तुम्ही गाव सोडून जायचे’, अशी धमकी दिली.

शेजवळ हा सैन्य दलातून निवृत्त झाला आहे. त्याने पिस्तुलाच्या धाकाने दोघांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याला अटक केली असून, त्याच्याकडील पिस्तूल जप्त केले आहे.
- मंगल मोढवे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, फुरसुंगी ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com