‘कसबा कार्य गौरव’ पुरस्कार जाहीर

‘कसबा कार्य गौरव’ पुरस्कार जाहीर

Published on

पुणे, ता. २७ : श्रुतीसागर आश्रम फुलगाव संचलित, कसबा संस्कार केंद्राच्या ४०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा ‘कसबा कार्य गौरव’ पुरस्कार अक्षय शहापूरकर, क्षितिजा आगाशे, विनोद आढाव यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ‘कसबा गौरव’ पुरस्कार क्रीडापटू व शास्त्रीय नृत्यांगना गायत्री शेजवलकर आणि ‘बाल गौरव’ पुरस्कार साहसी क्रीडा खेळाडू शिवांश कर्डे व निष्ठा जाबरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी (ता. ३१) सायंकाळी पाच वाजता सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात होणार आहे, अशी माहिती केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अनघा दिवाणजी, सारिका पाटणकर, अपेक्षा राऊत, समृद्धी जाजू, संदीप लचके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com