गुंड टोळीतील म्होरक्याचे नाना पेठेत उदात्तीकरण

गुंड टोळीतील म्होरक्याचे
नाना पेठेत उदात्तीकरण
Published on

पुणे, ता. २७ ः नाना पेठेतील आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी सूरज ठोंबरे याचे उदात्तीकरण करणाऱ्या पत्रकांचे वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी योगेश रमेश मोरे, गौरव दिलीप कोठारी, प्रसाद दिलीप धायगुडे (तिघे रा. नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार शरद पाटील यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील भाजी मंडई परिसरात आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी सूरज ठोंबरे याचे उदात्तीकरण करणाऱ्या पत्रकांचे २६ मे रोजी वाटप करण्यात आले होते. शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना आरोपींनी हे कृत्य केले. याबाबत गुन्हा दाखल करून आरोपींना नोटीस बजाविण्यात आली आहे.
नाना पेठेत बंडू आंदेकर टोळीची दहशत आहे. आंदेकर टोळी आणि सूरज ठोंबरे टोळीत वैमनस्य आहे. आंदेकर टोळीने ठोंबरे टोळीतील निखिल आखाडे याचा ऑक्टोबर २०२३ मध्ये खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्या वर्षी एक सप्टेंबरला माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून केला होता. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गायकवाड याच्यासह १६ जणांविरुद्ध ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com