

पुणे, ता. २७ : वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेकडून (वॅमनिकॉम) ‘एआयसीटीई’ची मान्यता असलेला व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या दोन वर्षांच्या नवीन अभ्यासक्रमाचे उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुटानी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सहकार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पंकज कुमार बन्सल उपस्थित होते. संस्थेचे संचालक डॉ. सुवा कांता मोहंती तसेच अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहकारी संस्था आणि क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्णता, शाश्वतता व नैतिक नेतृत्व विकसित करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य व मूल्याधिष्ठित प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहकार या विशेष क्षेत्रासाठी डिझाइन केलेला हा अभ्यासक्रम सहकार मंत्रालयाच्या व्यावसायिक नेतृत्व तयार करण्याच्या प्रयत्नातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.