पंचनामे सुरू करण्याचे 
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पंचनामे सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Published on

पुणे, ता. २७ : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाचे पंचनामे तत्काळ सुरु करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल, कृषी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि पशुसंवर्धन विभागांना दिले आहेत.
पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती व इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात सुरु असलेल्या पर्जन्यमानाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घ्यावा व घडलेल्या घटनांबाबत तत्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास सुरु आहे. त्याचा हेल्पलाइन क्रमांक ०२०-२६१२३३७१, २६१३३५२२ व टोल फ्री क्रमांक १०७७ हा असून या नियंत्रण कक्षाशी तालुका व गावपातळीवरील नागरिकांनी तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन डुडी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com