मयूरी जगताप प्रकरणाबाबत कारवाईचे निर्देश दिले होते
पुणे, ता. २७ : वैष्णवी हगवणे यांची जाऊ मयूरी जगताप-हगवणे यांना कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मेघराज जगताप आणि लता जगताप यांनी ई-मेलद्वारे राज्य महिला आयोगाकडे दाखल केली होती. तक्रार आल्यानंतर आयोगाकडून पौड ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना या प्रकरणात कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिली.
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणाची दखल घेत आयोगाने बावधन पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बावधन पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. त्याचप्रमाणे मयूरी जगताप यांच्या कौटुंबिक छळाच्या प्रकरणातही पोलिसांना कारवाईचे निर्देश दिल्यानुसार त्यांनी तक्रार दाखल करून पुढील तपास केला. पोलिस तपासाबाबत असमाधानी असल्याचे किंवा इतर कुठल्याही बाबींबाबत तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी आयोगाशी संपर्क साधलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

