संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला

संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला

Published on

पुणे, ता. २८ ः शहरात गेल्‍या पाच महिन्यांत चार हजार १४१ रुग्‍णांना अतिसाराची बाधा (डायरिया) झाल्‍याची नोंद पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. यावर्षी जानेवारी ते मे यादरम्‍यान ही रुग्‍णसंख्‍या आढळली. त्‍याचबरोबर विषमज्वर (टायफॉईड) आणि कावीळ (व्हायरल हिपॅटायटीस) सारख्या संसर्गजन्य आजारांचीही रुग्णसंख्या चिंताजनकरीत्या वाढलेली दिसून येते.
या पाच महिन्यांत अतिसाराचे एकूण चार हजार १४१ रुग्णांपैकी फेब्रुवारीत सर्वाधिक ८६२ रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णसंख्या जानेवारीपासून मेपर्यंत सातत्याने वाढती राहिल्याचे दिसते व आता तर पावसाळ्यामुळे त्‍यामध्‍ये आणखी वाढ होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍याचबरोबर आमांश (बॅसिलरी डिसेन्ट्री) हा अतिसारासारख्या पचनसंस्थेच्या आजारांची रुग्णसंख्याही मार्चमध्ये सर्वाधिक ३९ इतकी होती. ती एप्रिलमध्ये घटून सात झाली होती, मात्र मे महिन्यात पुन्हा एकदा १२ रुग्ण आढळल्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. याच कालावधीत व्हायरल कावीळ रुग्ण जानेवारीत आठ होते. एप्रिल व मेमध्ये प्रत्येकी १७ रुग्ण नोंदविले गेले. या काळात विषमज्वर आणि तापाचे रुग्णही सतत आढळून आले आहेत. याचे जानेवारीत २४ रुग्ण नोंदविले गेले होते, तर मे महिन्यात त्यात वाढ होऊन २९ रुग्णांची नोंद झाली. यामुळे दूषित पाणी आणि अन्न यांच्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होते. या सर्व आजारांच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बाब म्हणजे, जानेवारी ते मे या कालावधीत पुण्यात कॉलराचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

महत्त्वाचे
- आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्वच्छतेच्या बाबतीत अधिक जागरूक होण्याचे आवाहन
- पिण्याचे पाणी उकळून पिणे, उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांपासून दूर राहावे
- हात स्वच्छ धुवावे
- ताप, जुलाब, उलटी, थकवा किंवा पचनसंस्‍थेशी संबंधित कोणतीही लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com