जिल्ह्यात अकरा मंडळात ६५ मिमी हून अधिक पाऊस

जिल्ह्यात अकरा मंडळात ६५ मिमी हून अधिक पाऊस

Published on

पुणे, ता. २७ : जिल्ह्यामध्ये सोमवारी वाढलेला पावसाचा जोर काहीसा मंगळवारी (ता. २७) कमी झाला. जिल्ह्यातील अकरा मंडळांमध्ये ६५ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे तर, केवळ मुळशी तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढले. मुळशीमध्ये दिवसभरात ५४.६ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक मावळ तालुक्यात ६३ मिलिमीटर पाऊस झाला असून, मावळातील कार्ला, खडकाळा आणि कुसगाव मंडळांमध्ये प्रत्येकी ९४.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने शेती पिकांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेताचे बांध फुटल्याने जमीन वाहून जाण्याचे प्रकार सोमवारी झालेल्या पावसाने घडले आहेत. त्यासाठी आता प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानीचे पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. बारामती तालुक्यात दोन दिवस पडलेल्या पावसामुळे जैनकवाडी पाझर तलाव पूर्ण भरून धोक्याची पातळी निर्माण झाली होती. प्रसंगावधान राखत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सांडव्यातील अडथळा दूर करून पाण्याचा मार्ग मोकळा केल्याने नुकसान टळले असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी सांगितले. बारामती-कळंब-बावडा मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. रस्ता बंद झाल्यामुळे तेथून जाणाऱ्या प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची सोय संबंधित सरपंच आणि गावातील नागरिकांनी केली होती. दरम्यान, दिवसभरात मावळ तालुक्यातील सहा मंडळांत ६५ मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. जुन्नर, खेड, दौंड तालुक्यातील प्रत्येकी एक, तर शिरूरमधील दोन मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला.

तालुकानिहाय दिवसभरात झालेला पाऊस
तालुका -- पाऊस (मिमी)
हवेली -- ३४.४
मुळशी -- ५४.६
भोर -- ८.२
मावळ -- ६३
वेल्हे -- ७.१
जुन्नर -- २४.२
खेड -- ४२.१
आंबेगाव -- १८.७
शिरूर-- ४७.४
बारामती -- २१.६
इंदापूर -- ४४.९
दौंड -- ३५
पुरंदर -- १८.६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com