‘सकाळ वास्तू एक्स्पो’त ग्राहकांची स्वप्नपूर्ती

‘सकाळ वास्तू एक्स्पो’त ग्राहकांची स्वप्नपूर्ती

Published on

पुणे, ता. ३१ : घरांचे तसेच गुंतवणुकीचे अनेक पर्याय असणाऱ्या ‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे उद्घाटन शनिवारी उत्साहात झाले.
या वेळी समृद्धी ग्रुपचे संचालक सुनील निकम, शविरा डेव्हलपर्सचे पार्टनर विक्रांत शहा, राजश्री शाहू सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष शांताराम धनकवडे, उपाध्यक्ष कमल व्यवहारे, संचालक पद्माकर पवार, संचालक सतीश नाईक, संचालक सचिन पन्हाळे, संचालक सुनील जगताप, अभय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे, कर्मचारी संचालक सुनील देसाई आदी उपस्थित होते.
डोईफोडे म्हणाले, ‘‘सकाळ’च्या या कौतुकास्पद एक्स्पोमध्ये बँकिंग पार्टनर म्हणून सहभागी होताना आनंद होत आहे. लहानपणापासूनच आपल्या सर्वांचे एक स्वप्न असते ते म्हणजे स्वतःचं घर असावं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे प्रदर्शन ग्राहकांसाठी किफायतशीर ठरेल. ‘सकाळ वास्तू एक्स्पोत’ जे ग्राहक वास्तू खरेदीसाठी राजर्षी शाहू बँकेकडे गृह कर्जासाठी संपर्क साधतील, त्यांना प्रोसेसिंग फी पूर्ण माफ असेल. तसेच, गृह आणि फार्म हाऊससाठी किफायतशीर व्याजदराने २० वर्षे मुदतीचे कर्ज कमीतकमी कागदपत्रे आणि तत्काळ मंजुरीवर उपलब्ध करून देत आहोत.’’
‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी अनेकांनी एक्स्पोला भेट देत विकसकांकडून त्यांच्या प्रकल्पांची माहिती घेतली. या एक्स्पोसाठी राजश्री शाहू सहकारी बँक लिमिटेड हे बँकिंग पार्टनर आहेत.

‘सकाळ वास्तू एक्स्पो’मुळे ग्राहकांची प्रॉपर्टी खरेदीसाठीची धावपळ कमी होते. आम्ही नेहमीच यामध्ये सहभाग घेतो. आमचे नवीन प्रोजेक्ट्स या वेळेस पाहायला भेटतील. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
- आनंद अग्रवाल,
व्यवस्थापकीय संचालक, सेराटेक ग्रुप

गेल्या १८ वर्षांपासून अर्हम कॉर्प प्रीमियम आणि विश्वासार्ह प्लॉटेड डेव्हलपमेंटमध्ये कार्यरत आहे. आम्ही विकसित करत असलेल्या फार्महाऊस प्लॉटिंग प्रकल्पांमध्ये सौंदर्य, नियोजन, सुरक्षितता व आधुनिक सुविधांचा परिपूर्ण संगम साधला जातो. हे प्रदर्शन आम्हाला योग्य आणि सजग ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देत आहे.
- नरेंद्र जैन,
संस्थापक, अर्हम कॉर्पोरेशन

गुंतवणुकीसाठी सुरक्षित व चांगला पर्याय शोधत होतो. त्यात या एक्स्पोची माहिती समजली. त्यामुळे हा एक्स्पो कधी सुरू होतो, त्याची वाटच पाहत होतो. येथे मनासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
- शुभम सावतकर, ग्राहक, हिंजवडी

एक्स्पोची वैशिष्ट्ये....
- १५ हून अधिक विकसकांचा सहभाग
- ७५ हून अधिक प्रकल्प
- वन, टू, श्री आणि फोर बीएचके सदनिका
- व्यावसायिक जागा
- बंगलो, फार्म प्लॉट व एनए प्लॉट

हे लक्षात ठेवा :
- कधी : रविवार (ता. १ जून)
- कोठे : माऊली गार्डन, बाणेर रस्ता, भारत पेट्रोलियम पंपाजवळ, बाणेर (वातानुकूलित हॉल)
- केव्हा : सकाळी १० ते रात्री ८
- सुविधा : प्रवेश व पार्किंग विनामूल्य
- अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६४६७२४३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com