पब्जी खेळताना मित्राच्या हातून गोळी सुटली
उत्तमनगर पोलिस ठाण्यात जखमीसह पाचजणांवर गुन्हा दाखल

पब्जी खेळताना मित्राच्या हातून गोळी सुटली उत्तमनगर पोलिस ठाण्यात जखमीसह पाचजणांवर गुन्हा दाखल

Published on

पुणे, ता. ४ : पब्जी खेळताना पिस्तुलातून गोळी सुटून एका तरुणाच्या पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात गोळी लागलेला तरुण व त्याच्या मित्रांनी खरी माहिती लपवीत अल्पवयीन मुलाचे नाव पुढे करून, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी तरुण संकेत संजय मोहिते (वय २०, रा. शिवणे) याच्यासह त्याचे मित्र सागर प्रदीप कोठारी (वय २२), पार्श्वनाथ शिरीष चाकोते (वय २५), जाफर सादिक अली शेख (वय २०) आणि वैभव लक्ष्मण धावडे (वय २२) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
संकेत मोहिते या तरुणाला उजव्या पायाच्या नडगीस गोळी लागून, तो जखमी झाल्याची माहिती सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन येथून पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर हे तातडीने रुग्णालयात पोहोचले. सुरवातीला संकेत मोहिते याने, अल्पवयीन मुलाकडे पिस्तूल असून, ते दाखवत असताना चुकून गोळी सुटली आणि ती स्वतःच्या पायाला लागली, असे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. मात्र त्याचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर यांनी अधिक चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली.
संकेत मोहिते हा त्याच्या मित्रांसमवेत घरी एकत्र बसून पब्जी गेम खेळत होते. दरम्यान, सागर कोठारी हा ताब्यातील पिस्तूल काढून इतरांना दाखवत होता. हे पिस्तूल लोड-अनलोड करत असताना ते अडकले आणि ते पार्श्वनाथ चाकोते याने हाताळताना अचानक गोळी सुटली. गोळी थेट संकेत मोहिते याच्या पायावर लागली, असे तपासात समोर आल्याची माहिती उत्तमनगर पोलिसांनी दिली. पोलिस उपायुक्त संभाजी पाटील आणि सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com