

पुणे, ता. २८ : चिन्मय मिशन या वैश्विक आध्यात्मिक संस्थेचे प्रमुख स्वामी तेजोमयानंद यांची लोहगाव येथील चिन्मय माउली आश्रमात प्रवचनमाला आयोजित केली आहे. ‘रामायण’ या विषयावर एक ते सहा एप्रिलदरम्यान ही प्रवचनमाला होणार आहे.
रामायणातून आपल्याला अनेक जीवनमूल्यांचे प्रत्यक्ष दर्शन होते. रामायणातील प्रत्येक पात्र आपल्याला कोणत्या ना कोणत्या जीवनावश्यक मूल्यांचा सर्वोच्च बिंदू आपल्या कृतीतून दाखवते. या सर्व पात्रांचा, मूल्यांचा आधार आपले श्रीरामच आहेत. प्रभू श्रीराम वनवासानंतर परतल्यानंतर मोठ्या थाटामाटात राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर श्रीरामांनी अयोध्यावासीयांना जो पहिला संदेश दिला, त्या भागाला ‘पुरजन गीता’ म्हणतात. ती ऐकण्याची संधी प्रवचनाच्या माध्यमातून मिळणार आहे. हे प्रवचन दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेसातपर्यंत असेल. ही प्रवचन-मालिका सर्वांसाठी विनामूल्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.