वाढत्या तापमानाचा ‘ताप’

वाढत्या तापमानाचा ‘ताप’
Published on

पुणे, ता. २८ : पुण्‍यासह राज्‍यात तापमानाचा पारा वाढतो आहे. पुण्‍यात तर तो ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. विदर्भ, मराठवाड्यातही ऊन बरेच तापत आहे. आतापर्यंत राज्‍यात २३ रुग्‍ण आढळले आहेत. त्‍यामुळे आरोग्‍य विभागही सजग झाला असून विशेष कक्ष सज्ज करण्यात आले आहेत.
यंदा मार्च महिन्‍यातच उन्‍हाळा तीव्र झाला आहे. त्‍यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील सर्व आरोग्य संस्थांमध्ये आपत्कालीन उपचारांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. राज्य स्तरावरून सर्व जिल्हे, महापालिका स्तरावरील साथरोग वैद्यकीय अधिकारी यांना पूरक प्रशिक्षण घेण्यात आले आहे, अशी माहिती वातावरणीय बदल व मानवी आरोग्य सल्लागार डॉ. मयुरेश सासवडे यांनी दिली.
जिल्‍हे ः उष्‍माघाताचे रुग्‍ण
गडचिरोली ः ४
बुलडाणा-नागपूर ः प्रत्‍येकी ३
परभणी ः २
पालघर-लातूर प्रत्‍येकी ः २
नांदेड, नाशिक, धाराशिव, रायगड, सांगली, ठाणे, वर्धा ः प्रत्‍येकी १
एकूण ः २३
...............
उष्णतेच्या लाटेत घ्यावयाची काळजी ः
- शक्य असल्यास सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कामांचे वेळापत्रक आखा
- ऊन जास्त असताना शक्यतो सावलीत थांबा
- उन्हात जाताना टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा
- डोके झाकून ठेवा
- शरीरातील जलपातळी समतोल ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या
- ताज्या फळांचा रस, लिंबूपाणी, ताक, कोकम सरबत घ्या
- पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे, सुती व आरामदायक कपडे परिधान करा
- फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा
- की कलिंगड, काकडी, टरबूज अशी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा
- जास्त घाम येत असेल तर ओआरएस, साखर-मीठ पाणी किंवा ताक प्या.
- दिवसातून दोन वेळा स्थान करा
- कामाच्या वेळा उष्णतेच्या तीव्रतेनुसार ठरवा
---

हे टाळा
- काळ्या किंवा गडद रंगाचे जाड कपडे घालू नका
- कार्बोहायड्रेटेड असलेली शीतपेये, सोडा, अल्कोहोलयुक्त पेय टाळा (त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते)
- दुपारच्या वेळी शारीरिक श्रमाची कामे टाळा
- भूक लागली नाही म्हणून अजिबात न जेवता हलका आहार तरी घ्या
---
उष्माघाताची लक्षणे
- तीव्र डोकेदुखी, उलट्या, श्वास घेण्यास त्रास. त्वचा कोरडी पडून घाम येणे, चक्कर येणे, बेशुद्ध अवस्था
- निर्जलीकरणाची (डिहायड्रेशन) लक्षणे
- तोंड कोरडे पडणे, अशक्तपणा
- लघवी कमी होणे
- उष्णतेचा थकवा ः खूप घाम येणे, रक्तदाब कमी होणे, अशक्तपणा, हृदयाचे ठोके वाढणे
- उष्‍माघात घात ः स्नायूंमध्ये वेदना, विशेषतः पाय आणि हातांमध्ये
..............
राज्‍यात उष्णतेची लाट वाढल्‍याने परिणाम आरोग्यावर होत आहेत. उष्णता वाढणे, शरीराचे निर्जलीकरण, उष्माघात आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी उष्णतेपासून आपले संरक्षण करावे. आजारी व्यक्तींनी उष्णतेच्या लाटेच्या काळात अधिक सावधगिरी बाळगावी आणि गरज असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. बबिता कमलापूरकर, सह-संचालक (हिवताप हत्ती रोग व जलजन्य आजार)
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com